पनवेल : रामप्रहर वृत्त
भारताचे माजी पंतप्रधान, थोर राजनेते, कुशल वक्ते व कवीहृदयी व्यक्तिमत्त्व भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती गुरुवारी (दि. 25) पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, दीपक बेहेरे, कर्जतचे माजी तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर, माथेरान नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, शहर अध्यक्ष प्रवीण सकपाळ, नेरळ मंडळ अध्यक्ष नरेश मसणे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, पनवेल नगर परिषदेचे माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, कामगार नेते रवींद्र नाईक यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी अटलजींच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून आदरांजली वाहिली.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देत भारतीय लोकशाही अधिक बळकट केली. संवाद व सहमतीचा मार्ग त्यांनी नेहमी स्वीकारला. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळातील सुवर्ण चतुर्भुज महामार्ग योजना, पोखरण अणुचाचणी, ग्रामसडक योजना तसेच परराष्ट्र धोरणातील धाडसी व दूरदृष्टीपूर्ण निर्णय आजही स्मरणात राहणारे आहेत. राजकारण हे सत्तेसाठी नव्हे तर सेवेसाठी असते, हा संदेश त्यांनी आपल्या आचारातून दिला. कवी म्हणून त्यांनी लिहिलेल्या कविता समाजाला संवेदनशीलता व राष्ट्रप्रेमाचा संदेश देणार्या ठरल्या. अटलजींच्या विचारांना पुढे नेण्याचा संकल्प आणि त्यांच्या आदर्शांवर चालणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली असल्याचेही त्यांनी आपल्या मनोगतात अधोरेखित केले.
Check Also
यशाचा सोहळा; सामना, बनवाबनवी, माहेरची साडी… आणि ‘देऊळ बंद २’चा
यश हे सर्वाधिक ताकदवान टॉनिक… चित्रपटाच्या जगात यशाचे नाणं कायमच चालणारं. सर्वांनाच हवेहवेसे वाटणारे. जपून …
RamPrahar – The Panvel Daily Paper