पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासाकरिता निधी आणण्याचे काम आम्ही करतो, मात्र राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचवणे आणि त्यांच्या समस्या सोडवण्याची जबाबदारी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वीकारावी, असे प्रतिपादन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांनी पाले बुद्रुक येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीतून करण्यात येणार्या ग्रामीण भागातील विविध विकासकामांच्या शुभारंभावेळी केले.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकांचे रणशिंग फुंकत, प्रचाराची धुरा प्रभावीपणे सांभाळून वावंजे जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवा, असे आवाहनही कार्यकर्त्यांना केले. पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनेवल तालुक्यातील पाले बुद्रुक गावाचा कायापालट करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला असून बुधवारी या परिसरात विविध कामांचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा उत्साहात झाला. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एक कोटी 50 लाख रुपयांच्या अर्थसंकल्पीय निधीतून साकारलेल्या साकव-3 या मोठ्या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. त्याचप्रमाणे पालेश्वरी मंदिर ते लक्ष्मण उलवेकर यांच्या घरापर्यंतचा रस्ता, कर्शनी विहार येथील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण, कर्शनी विहार ते प्रशांत म्हात्रे घरापर्यंतची गटार लाईन आणि पालेश्वरी मंदिर ते दीपक उलवेकर यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करून ही कामे जनतेसाठी खुली करण्यात आली आहेत.
लोकार्पणासोबतच नवीन कामांचे भूमिपूजनही या वेळी पार पडले. यात मकरध्वज सभा मंडपासाठी 30 लाख रुपये, फणसवाडी येथील साकव कामासाठी 20 लाख रुपये आणि पालेबुद्रुक तलावावर गणेश घाट बांधण्यासाठी दोन लाख 50 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय गोविंद म्हात्रे ते वसंत तांडेल यांच्या घरापर्यंतचे रस्ते, किशोर भोपी ते विकास पाटील यांच्या घरापर्यंतची कामे आणि अंगणवाडी पर्यंतच्या बंदिस्त गटारांच्या कामांना आता प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. या कामांचा शुभारंभ भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाला.
भाजपच्या या विकास पर्वामुळे पाले बुद्रुकचा सर्वांगीण विकास होत असल्याची भावना नागरिकांनी यावेळी व्यक्त केली. या विकास कामांच्या शुभारंभावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, संजय पाटील, भाजपचे पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर, भाजपनेते एकनाथ देशेकर, माजी सरपंच कृष्णाशेठ पाटील, प्रकाश खैरे, अंकुश पाटील, सरपंच निखिल तांडेल, उपसरपंच पप्पू पारधी, लक्ष्मण उलवेकर, कांचन वासकर, निराशेटतांडेल, दशरथ वासकर, बाळाराम पवार, केशव उलवेकर, मधुकर उलवेकर, त्रिंबक तांडेल, केतन तांडेल, विष्णु उलवेकर, नाना तांडेल, प्राशन पवार, व्यास पवार, दिलीप वासकर, शिवराम उलवेकर, अर्जुन मोरे, प्रमोद गोपी, विश्वास पवार, सतीश भोपी, किशोर गोपी, कुंडल वासकर, पांडुराम फडके, प्रदीप म्हात्रे, रघुनाथ तांडेल, अविनाश उलवेकर, दीपक उलवेकर, जनार्दन उलवेकर, रवींद्र तांडेल, शिवराम म्हात्रे, संदीप म्हात्रे, प्रसन्न म्हात्रे, सविता उलवेकर, कुष्णा उलवेकर, करुणा उलवेकर, भरती उलवेकर, छाया उलवेकर, निशा मोरे, योगिता उलवेकर, कृष्णाबाई मोरे, प्रणाली उलवेकर, प्रगती उलवेकर, भावना उलवेकर, कल्पना बारसे, तृप्ती पवार, कुंदा पवार, स्वाती उलवेकर, वैशाली भोपी, मनीषा भोपी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Check Also
उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डीचा थरार!
पनवेल ः रामप्रहर वृत्तसंघभावना, अचूक रणनीती, वेगवान चढाया आणि बचावातील नियंत्रण यांचा रोमांचक संगम उलवे …
RamPrahar – The Panvel Daily Paper