Thursday , March 23 2023
Breaking News

राजेश गायकर यांची प्रसार अभियान सरचिटणीसपदी निवड

पनवेल ः वार्ताहर

पंतप्रधान जनकल्याणकारी योजनेचा प्रचार-प्रसार अभियानाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी राजेश गायकर यांची निवड करण्यात आली आहे. अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष (युवा) भरत कात्यायन व राष्ट्रीय सरचिटणीस अंकित संचेती यांनी  राजेश गायकर यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. प्रदेश उपाध्यक्ष विनय वर्मा यांनी नुकतेच गायकर यांना त्यांच्या नियुक्तीचे पत्र दिले असून मुंबईसह कोकण विभागातील सहा जिल्ह्यांची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात  आली आहे.  भाजपचे ज्येष्ठ नेते व रायगडचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर, भाजपाचे रायगड जिल्ह्याचे प्रवक्ते वाय. टी. देशमुख, आरपीआयचे कोकण प्रदेश अध्यक्ष भाई जगदीश गायकवाड  यांच्यासह पनवेलच्या महापौर डॉ.कविता चौतमोल, उपमहापौर विक्रांत पाटील, स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, ‘क’ प्रभाग समिती सभापती दिलीप पाटील, सभापती विकास घरत, डॉ. अरुण भगत, नगरसेवक विजय चिपळेकर, प्रदीप भगत, आर. जी. म्हात्रे, एस. के. भगत, रमेश म्हात्रे, संतोष म्हात्रे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व सहकारी कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Check Also

पनवेलमध्ये गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागताचा उत्साह

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत समितीच्या वतीने आयोजित शोभायात्रेत लहान मुलांसह महिला, …

Leave a Reply