Breaking News

‘लाख’ मोलाच्या महिला क्रिकेट चाहत्या

लंडन : वृत्तसंस्था

इंग्लंडमध्ये 30 मे पासून सुरू होत असलेल्या वर्ल्डकपचे एक वैशिष्ट्य पाहायचे झाले, तर या स्पर्धेसाठी तब्बल एक लाख महिला क्रिकेट चाहत्यांनी तिकिटांची खरेदी केली आहे. आतापर्यंत वर्ल्डकपसाठी महिलांनी दिलेली ही सर्वाधिक पसंती आहे. स्पर्धा संचालक स्टीव्ह इलवर्दी यांनी ही माहिती दिली आहे.

इलवर्दी म्हणतात की, या वर्ल्डकपला महिलांनी दिलेली पसंती लक्षणीय आहे. जवळपास एक लाख 10 हजार महिलांनी वर्ल्डकप सामन्यांची तिकिटे विकत घेतली आहेत. 16 वर्षांखालील मुलांची संख्या एक लाख आहे, जे क्रिकेट वर्ल्डकपचा आनंद लुटण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे क्रिकेटसारख्या खेळाकडे युवा वर्ग मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत असल्याचे चित्र दिसते आहे. इलवर्दी यांनी सांगितले की, या वेळी प्रथमच दोन लाख लोक क्रिकेट पाहण्यासाठी येणार आहेत. हे चित्र नक्कीच सुखावणारे आहे. वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेच्या 12व्या अध्यायासंदर्भात इलवर्दी, आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन व स्पर्धेच्या सुरक्षा विभागाचे प्रमुख जिल मॅकक्रॅकन यांनी ओव्हल येथे पत्रकारांशी संवाद साधला, तेव्हा त्यांनी तिकिटांविषयी ही माहिती दिली. इलवर्दी म्हणाले की, तिकिटांच्या बाबत अनेक विक्रम या वेळी रचले गेले आहेत. जवळपास 30 लाख लोकांनी वर्ल्ड कप तिकिटांसाठी अर्ज केले होते. त्यातील काही ठराविक सामन्यांसाठी चार लाख अर्ज आल्याचेही आम्हाला दिसले.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply