पनवेल : वार्ताहर
येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात नुकताच पदवीप्रदान समारंभ झाला. या वेळी बीएड् आणि एमएड्च्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. चंद्रकांत मढवी आणि अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रमा भोसले उपस्थित होते. प्रा. डॉ. सुविद्या सरवणकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुनीता लोंढे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. कार्यक्रमास प्रा. चंद्रकांत मढवी, डॉ. प्रमोद जोशी, डॉ. नीलिमा मोरे, प्रा. रमेश भोसले आणि इतर शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. मान्यवरांचे आभार प्रा. रमेश भोसले यांनी मानले.