Breaking News

फुंडे हायस्कूलमध्ये शिवरायांना अभिवादन

उरण : रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेच्या उरण तालुक्यातील फुंडे येथील तु. ह. वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालयात मंगळवारी (दि. 19) महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी झाली. विद्यालयाचे पर्यवेक्षक आर. पी. ठाकूर, जी. सी. गोडगे, ज्युनिअर विभाग प्रमुख व्ही. के. कुटे, तांत्रिक विभागप्रमुख आर. बी. गिर्‍हे, गुरुकुल प्रमुख आर. एल. प्रक्षाळे, सांस्कृतिक विभागप्रमुख दर्शना माळी आणि सर्व शिक्षक बंधू-भगिनींच्या उपस्थितीत शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. या वेळी समाजशास्त्र विषयाचे ज्येष्ठ शिक्षक एन. एल. गावंड आणि एस. टी.म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती सांगितली. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनीसुद्धा शिवरायांच्या कार्याची माहिती सांगणारी भाषणे केली. ‘जय भवानी जय शिवाजी’ ही घोषणा देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply