Breaking News

विधिमंडळात नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटीलांच्या नावाचा ठराव मंजूर!

भूमिपुत्रांचा सन्मान केल्याची सर्वपक्षीय कृती समितीची भावना

मुंबई : प्रतिनिधी
औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्या नामांतराचा ठराव मंजूर झाला आहे. औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव धारशिव तर नवी मुंबई विमानतळाचे नाव दि. बा. पाटील या नावांना गुरुवारी (दि. 25) विधासभेत मंजुरी मिळाली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेऊन लाखो भूमिपुत्रांचा सन्मान केला असल्याची भावना लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीने व्यक्त केली आहे.
विधानसभेत तीन प्रस्ताव मंजूर त्यामध्ये औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजी नगर करण्यात आले आहे. त्याचबरोबर उस्मानाबादचे नाव धारशिव करण्यात आले आहे. तर नवी मुंबईतील विमानतळाचे नाव दि. बा. पाटील असे नामकरण करण्याचा ठराव सभागृहात मंजूर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव आता मुख्यमंत्री केंद्र सरकारकडे पाठविणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.
औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास 16 जुलै रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली होती. त्याचप्रमाणे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असे नामकरण करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. हा नामांतराचा प्रस्ताव गुरुवारी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मंजुरीसाठी सादर करण्यात आल्यानंतर त्याला मंजुरी देण्यात आली आहे.
नवी मुंबई परिसरातील विकासामध्ये असलेले लोकनेते दि. बा. पाटील यांचे योगदान व स्थानिकांच्या विविध संघटनांची मागणी विचारात घेता, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असे करण्यास जुलैमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानंतर गुरुवारी विधानसभेतही या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मंजुरी दिली होती. तो प्रस्ताव त्यांनी हा ठराव विधानसभेतही मांडला आणि तिथेही या ठरावाला मंजुरी मिळाली. त्याबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार. तसेच प्रकल्पग्रस्त, सामान्य जनतेनेही गेली दोन वर्षे विमानतळाला दि. बा. पाटीलांचे नाव देण्यासाठी जो निकराचा निकराचा लढा दिला, त्यांच्या त्या लढ्याला मिळालेला हा विजय आहे, असेही मी समजतो. त्यामुळे मी त्यांचेही पुन्हा अभिनंदन करतो.
– आमदार प्रशांत ठाकूर, कार्याध्यक्ष, लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply