Breaking News

सिडको गृहनिर्माण योजनेतील यशस्वी अर्जदारांसाठी अंतिम मुदत

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त  : सिडको महागृहनिर्माण योजना 2018 व 2019 मध्ये यशस्वी झालेल्या ज्या अर्जदारांनी अद्याप कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही अशा यशस्वी अर्जदारांना सर्व कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी सिडको महामंडळातर्फे दिनांक 31 मे 2019 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. अद्यापपर्यंत सदर गृहनिर्माण योजनांतील 953 यशस्वी अर्जदारांनी कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याचे सिडको महामंडळाच्या निदर्शनास आले आहे. सदर अर्जदारांना वेळोवेळी एसएमएस, ई-मेल व त्याचप्रमाणे संकेतस्थळावरदेखील सूचित करण्यात आले आहे. या सर्व अर्जदारांची यादी सिडकोच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सिडको महामंडळाने सदर यशस्वी अर्जदारांच्या कागदपत्र पडताळणीसाठी दिनांक 1 एप्रिल 2019 रोजी निवारा केंद्र सुरू केले होते. या निवारा केंद्राच्या माध्यमातून यशस्वी अर्जदारांनी त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक होते. कागदपत्रांची पूर्तता न केलेले जे अर्जदार सिडको महामंडळाच्या निदर्शनास आलेले आहेत, त्यांना सर्व कागदपत्रांची पूर्तत करण्यासाठी 31 मे 2019 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली असून सदर अर्जदारांनी व्यक्तिशः येऊन सिडको निवारा केंद्र, टी-271, आठवा मजला, टॉवर नंबर-10, बेलापूर, नवी मुंबई येथे भेट द्यावी व आपल्या कागदपत्रांची पूर्तता करावी, असे सिडकोतर्फे सूचित करण्यात येत आहे.

विहित कालावधीत सदर अर्जदार जर कागदपत्रांची पूर्तता करू शकले नाहीत, तर अशा सर्व अर्जदारांचे इरादापत्र रद्द करून प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांसोबत वाटपपत्राबाबतची पुढील कार्यवाही करण्यात येईल. याची 953 यशस्वी अर्जदारांनी नोंद घ्यायची आहे. सदर अर्जदारांनी अधिक माहितीकरिता दूरध्वनी क्रमांक 022-627222250 व टोल फ्री क्रमांक 022-20871183 येथे संपर्क साधावा.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply