जम्मू ः जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. अनंतनागमधील कोकेरनाग येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. मंगळवारी सकाळपासून या भागात शोधमोहीम सुरू होती. यादरम्यान दहशतवादी आणि सुरक्षा दलांत चकमक झाली. या चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या 23 दिवसांत सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात मोहीम राबवत 18 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …