Breaking News

चेन्नई येथे साकारणार संतोष गुरव स्पोर्ट्स अ‍ॅण्ड एज्युकेशन कॉलेज

नागोठणे : प्रतिनिधी

लगोरी खेळाचे जनक, क्रीडारत्न स्व. संतोष गुरव यांच्या अतुलनीय कार्याची तमिळनाडूच्या लगोरी संघटनेने दखल घेतली आहे. स्व. संतोष गुरव यांच्या जयंतीनिमित्त तमिळनाडू राज्य संघटनेचे अध्यक्ष अय्यनार रामचंद्रन यांनी पेरूम्बक्कम, चेन्नई येथे गुरव यांच्या नावाने आपल्या स्वतःच्या बारा एकर जागेत भव्य दिव्य असे संतोष गुरव स्पोर्ट्स अ‍ॅण्ड एज्युकेशन कॉलेज वर्षभरात चालू करण्यात येणार असून कामाला सुरुवात सुद्धा करण्यात आली असल्याची घोषणा रामचंद्रन यांनी केली.

स्व. गुरव यांनी क्रीडा क्षेत्रात स्वतःला वाहून घेताना संपूर्ण भारतासह जगभरातील 30 देशांमध्ये जाऊन लगोरी खेळ रुजवला होता. गुरव यांनी तमिळनाडू, तसेच पाँडेचरी राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालयात जाऊन लगोरीचे प्रशिक्षण दिले होते व त्यांच्या कार्याने आम्ही खूपच प्रभावित झालो होतो. त्यांची आठवण कायम राहावी या उदात्त हेतूने तमिळनाडूत अकॅडमी स्थापन करण्याचा आम्ही निर्णय घेतला असून 15 करोड रुपये खर्च करून लवकरच भव्य दिव्य अशी अकॅडमी, चेन्नई येथे लवकरच कार्यान्वित होईल, असा विश्वास रामचंद्रन यांनी व्यक्त केला. स्व. गुरव यांनी लगोरीसह वुशू, तलवारबाजी, किक बॉक्सिंग, बॉक्सिंग, रोप स्किपींग, वुडबॉल आदी खेळांमध्ये राज्य, राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक सुवर्णपदके संपादित करून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर हजारो खेळाडू घडवले म्हणून त्यांना क्रीडा महर्षी या नावाने संबोधिले जात होते, असे रामचंद्रन यांनी यांनी या वेळी स्पष्ट केले. दरम्यान, स्व. संतोष गुरव हे नागोठण्याचे रहिवासी आहेत व त्यांच्या नावाने तमिळनाडूत स्पोर्ट्स अकॅडमी स्थापन होत असल्याने नागोठण्यासह संपूर्ण रायगड, तसेच महाराष्ट्राच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला असल्याचे महाराष्ट्र राज्य एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार विजेते तथा भारतीय लगोरी संघटनेचे अध्यक्ष संदीप गुरव यांनी सांगितले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply