Breaking News

पेण येथे ट्रक-ट्रेलर अपघातात दोन जखमी

पेण : प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावरील जिते गावाजवळ मंगळवारी (दि.28) पहाटेच्या सुमारास ट्रेलर व ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत दोनजण जखमी झाले. 

पेण तालुक्यातील जिते गावाजवळील हॉटेल पार्किंग सहारासमोर मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ट्रेलर व ट्रक यांच्यात समोरासमोर ठोकर झाली. या अपघातात अशोक बितीलाल कुमार आणिअमीनऊद्दीन खान सुलतानपूर (दोघे रा. उत्तर प्रदेश) गंभीर जखमी झाले. या अपघातात दोन्ही गाड्यांचे चालक अडकले होते. पोलिसांनी ट्रेलरच्या सहाय्याने दोन्ही वाहने बाजूला केली व त्यांना पेणच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  या अपघाताची नोंद दादर सागरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply