पोपटराव पवार यांचे जलसंधारण व ग्रामीण विकास विषयक मार्गदर्शन
पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या औचित्याने महाविद्यालयाच्या ग्रामीण विकास विभागाचा वतीने गुरुवारी जलसंधारण आणि ग्रामीण विकास विषयक विशेष अतिथी सत्राचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम पद्मश्री, आदर्श ग्राम हिवरे बाजारचे उपसरपंच तथा भारत सरकारच्या जलसंधारण सुकाणू समितीचे सदस्य पोपटराव पवार यांची उपस्थितीत झाला. पोपटराव पवार यांनी ग्रामीण विकासाचे विविध पैलू, जलसंधारणाचे महत्त्व, माती आणि पाण्याचे असणारे अनन्य स्थानासंदर्भात विद्यार्थ्यांनी माहिती दिली.
या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांनी महाविद्यालयाच्या कीर्तीचा मागोवा घेतला. महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. बी. डी. आघाव, कलाशाखा प्रमुख डॉ. बी. एस. पाटील, वाणीज्य शाखा प्रमुख डॉ. एस. बी. यादव, रुसा समन्वयक डॉ. एस. एन. वाजेकर, इतिहास विभागाच्या प्रमुख डॉ. आर. डी. म्हात्रे, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.आर. व्ही. येवले, भूगोल विभाग प्रमुख डॉ. डी. एस. नारखेडे, प्राणिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मंदा म्हात्रे, अर्थशास्त्र विभागाचे के. एन. ढवळे, हिंदी विभागाच्या डॉ. गीतिक तंवर, यांच्यासह विद्यार्थी आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामीण विकास विभागाच्या प्रमूख डॉ. एस. एम. भोईर यांच्या नेतृत्वाखाली भावेश भोईर आणि आकाश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.