Wednesday , February 8 2023
Breaking News

शिरवलीत ‘कमळ’ फुलणार

भाजप नेते अरुणशेठ भगत यांचा विश्वास

पनवेल : रामप्रहर वृत्त

विकासकामांच्या जोरावर शिरवली ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे कमळ फुलणार, असा विश्वास पक्षाचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी गुरुवारी (दि. 20) व्यक्त केला. ते जाहीर सभेत बोलत होते.

शिरवली ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीत भाजपची सभा गुरुवारी झाली. या सभेस भाजपचे तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, ओबीसी मोर्चा संघटक एकनाथ देशेकर, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, विस्तारक विश्वेश साठे, डॉ. आगलावे, तुकाराम पाटील, सिनारे, सरपंचपदाच्या उमेदवार रखमाबाई बोंडे, सदस्यपदाचे सर्व उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अरुणशेठ भगत पुढे म्हणाले की, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा झंजावात निर्माण झाला आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघात असे एकही गाव नाही जेथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विकासकाम झालेले नाही. त्यामुळे सुज्ञ जनता विकासाच्या विचारांना साथ देईल आणि भाजपला विजयी करेल.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन …

Leave a Reply