Breaking News

दहशतवादी हल्ल्याची भीती; काश्मीरमध्ये सैन्य वाढविले

नवी दिल्ली ः पाकिस्तानकडून पुन्हा एकदा भारतावर दहशतवादी हल्ला करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काश्मीर खोर्‍यात लपलेल्या दहशतवाद्यांकडून हा हल्ला करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांचा एक गट मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे लष्कराच्या 100 अतिरिक्त तुकड्या काश्मीर खोर्‍यात तैनात करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल जम्मू-काश्मीर दौर्‍यावरून परतल्यानंतर लष्कराच्या 100 अतिरिक्त तुकड्या म्हणजे 10 हजार भारतीय जवान तैनात केले आहेत. राज्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी डोवाल यांनी ज्येष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेतली. (संबंधित वृत्त पान 2 वर..)

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply