Breaking News

पावसाळ्यातही मिनीट्रेन सेवा सुरू ठेवण्यात भाजपला यश

पनवेल ः प्रतिनिधी

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नेहमीच सज्ज असणार्‍या माथेरान मिनीट्रेनची नेरळ-माथेरानदरम्यानची सेवा पाऊस नसतानाही 7 जूनपासून बंद करण्याचा अत्यंत घातकी निर्णय रेल्वेच्या अधिकार्‍यांनी घेतला होता. त्यामुळे वर्षाच्या शेवटच्या हंगामात स्थानिकांसह येथे आपली उपजीविका भागवणार्‍या श्रमिकवर्गावर गदा येणार होती. याकामी माथेरानमधील भाजपच्या शिष्टमंडळाने आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेऊन याबाबत तोडगा काढण्यासाठी गुरुवारी (दि. 6) पनवेल येथील त्यांच्या कार्यालयात जाऊन गार्‍हाणे मांडले होते.

त्यांची समस्या लक्षात घेत आमदार प्रशांत ठाकूर यांनी ताबडतोब रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याशी फोनवर याबाबत सविस्तर चर्चा करून नेरळ-माथेरान मिनीट्रेन सेवा काही काळ अधिक सुरू ठेवण्याची विनंती केली. त्यानुसार आता मिनीट्रेन आणखीन काही दिवस पर्यटकांना सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे श्रमिक वर्ग आणि पर्यटकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.  या वेळी भाजपचे माथेरान शहर अध्यक्ष विलास पाटील, उपाध्यक्ष सुभाष भोसले, माजी अध्यक्ष अरविंद शेलार, अक्षय सोनवणे आदी उपस्थित होते.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply