पनवेल ः प्रतिनिधी
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व पनवेल भाजपच्या वतीने महास्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 9, 15, 16 व 17मध्ये रविवारी (दि. 9) स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या स्वच्छता अभियानाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन पाहणी केली.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या
वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल भाजप आणि पनवेल
महापालिका यांच्या वतीने 1 ते 10 जूनदरम्यान पनवेल महापालिका हद्दीत महास्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत प्रभाग क्रमांक 9, 15, 16 व 17 या चार प्रभागांमध्ये महास्वच्छता अभियान उत्स्फूर्तपणे पार पडले. या अभियानात महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, प्रभाग समिती ‘ब’चे अध्यक्ष संजय भोपी, माजी उपमहापौर चारुशीला घरत, नगरसेवक एकनाथ गायकवाड, संतोष शेट्टी, प्रकाश बिनेदार, मनोज भुजबळ, समीर ठाकूर, महादेव मधे, नगरसेविका सीताताई पाटील, कुसुम म्हात्रे, राजश्री वावेकर, वृषाली वाघमारे, सुशीला घरत, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, ज्येष्ठ नेते सी. सी. भगत, जगदिश घरत, किशोर चौतमोल, भास्कर शेट्टी, अॅड. जितेंद्र वाघमारे, माजी नगरसेवक सुभाष भुजबळ, वॉर्ड अध्यक्ष विजय म्हात्रे, सुधाकर धवही, इन्फिनिटी फाऊंडेशनचे सदस्य यांच्यासह प्रभाग क्रमांक 9, 15, 16 आणि 17मधील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवरांनी सहभाग घेत परिसर स्वच्छ केला.
या वेळी प्रभाग समिती ‘ब’चे अध्यक्ष संजय भोपी, शहर अध्यक्ष जयंत पगडे आणि नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper