Breaking News

उरणच्या ‘इंडियन ऑइल’कडून 10 लाख रुपयांची मदत

अलिबाग : प्रतिनिधी

जिल्ह्यात गहिर्‍या होणार्‍या कोरोनासंकटाशी लढा देणार्‍या अलिबाग जिल्हा प्रशासनाच्या मदतीस उरण येथील इंडियन ऑइलटँकिंग कंपनीने हातभार लावत दहा लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना दिला. कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी कार्यालयात भेट देऊन ही मदत सुपुर्द केली. यापूर्वी कोरोनाची टाळेबंदी जाहीर झाल्यावर कंपनीने उरण तालुक्यातील आपल्या टर्मिनलजवळील गावांमध्ये सुमारे चार टन अन्नधान्य, दोन हजार मास्क व 750 लि. हॅण्डवॉश साबण अशी सामग्री वितरित केली आहे. तसेच, कंपनीच्या कर्मचार्‍यांनी आपल्या वेतनातून सुमारे पाच लाख रुपयांचा स्वेच्छानिधी उभारून कोविड मदत फंडास सुपुर्द केला आहे. अशा तर्‍हेने सुमारे वीस लाख रुपयांच्या सहाय्यातून सामाजिक बांधिलकी कोविड संकटात जपत  कोविड लढ्यात कंपनी प्रशासनाबरोबर आहे. इंडियन ऑइलटँकिंगकडून ऑपरेशन निर्देशक अतुल खराटे   व मनुष्यबळ निर्देशक नवीन चंद्रा यांनी जिल्हाधिकार्‍यांना कोरोनाकाळात व गेल्या आर्थिक वर्षात राबवलेल्या योजनांची माहिती दिली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply