Breaking News

चावणे ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वीच शेकापला जोरदार धक्का

कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश; पालकमंत्री आणि सिडको अध्यक्षांनी केले स्वागत

पनवेल ः प्रतिनिधी

चावणे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेकापच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 12) भाजपमध्ये जाहीर प्रवेश करीत शेकापला जोरदार दणका दिला आहे.

चावणे ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 23 जूनला आहे. या ग्रामपंचायत हद्दीतील सवणे येथील शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते भगवान देशमुख, चावणे येथील विलास सोनावळे, तुळशीमाळवाडी येथील तानाजी निरगुडा, दत्ता निरगुडा, भाऊ वाघ यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपत जाहीर प्रवेश केला. त्यांचे रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत करण्यात आले. या वेळी भाजपचे विभागीय अध्यक्ष किरण माळी, संदीप पाटील, मारुती पाटील, सचिन पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply