Breaking News

सीकेटी विद्यालयाचे शिष्यवृत्तीत सुयश

पनवेल ः प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेमार्फत फेब्र्ाुवारी 2019मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत नवीन पनवेल येथील मराठी माध्यमाच्या चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे.

नयन नारायण फडके, वैष्णवी नितीन शिंदे, जित विनोद गायकर अशी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील इयत्ता 5वीतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची नावे आहेत. पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता 8वीतील अर्पिता भरत जितेकर, संस्कृती संभाजी उकरंडे, प्रचिती नामदेव गायकर, दीपक अशोक माळी, प्रज्ञा महादेव देवकर या विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार जाधव सऱ, पर्यवेक्षिका इंदूताई घरत मॅडम़, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख तसेच संस्थेच्या कार्यकारिणी मंडळाच्या सर्व सदस्यांनी अभिनंदन केले आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply