Breaking News

खारघरमध्ये मिनीबस पुलावरून कोसळली; चालक जखमी

पनवेल : वार्ताहर

खारघर स्टेशनच्या उड्डाण पुलावरून एक मिनीबस खाली कोसळून बसचालक जखमी झाल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.

खेड येथून मिनी बस चालक इरफान खान हा त्याच्या ताब्यातील बस घेऊन मीरा रोड येथे चालला असताना खारघर स्टेशनच्या  उड्डाण पुलावर त्याची बस असताना अचानकपणे एका कंटेनर ने त्याच्या बसला धडक दिली. या अपघातात बस चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडीचे स्टेरिंग लॉक होऊन गाडी डाव्या बाजूला उड्डाणपुलावरून खाली कोसळली यात बस चालक किरकोळ जखमी झाला आहे. सुदैवाने या गाडीत प्रवाशी वर्ग नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

Check Also

खारघरमध्ये नाट्यगृह उभारणीकरिता भूखंड द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे आग्रही मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त एज्युकेशनल हब असलेल्या खारघरमध्ये …

Leave a Reply