Breaking News

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या प्रारुप मतदार याद्या आज प्रसिद्ध होणार

 नवी मुंबई ः बातमीदार
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्या तयार करण्याबाबतच्या कार्यक्रमांतर्गत प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी बुधवारी
(दि. 23) होणार असल्याची माहिती कोकण विभागाचे उप आयुक्त (सामान्य प्रशासन) मनोज रानडे यांनी दिली.
भारत निवडणूक अयोगाकडून कोकण विभाग शिक्षक मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम 1 ऑक्टोबर ते 30 डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येत असून प्रारुप मतदार याद्या व नोटीस 5ची प्रसिद्धी बुधवारी (दि. 23) प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या प्रारुप मतदार याद्या कोकण विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय, कोकण भवन, सीबीडी बेलापूर तसेच जिल्हाधिकारी तथा सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग यांची कार्यालये व संबंधित जिल्ह्यातील इतर पदनिर्देशित अधिकारी यांची कार्यालये या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीत प्रसिद्ध मतदार याद्यांवरील दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. 25 डिसेंबर रोजी दावे व हरकती निकाली काढून पुरवणी यादी छपाई करण्यात येईल. 30 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

Check Also

भाजप नेते धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर

मुंबई ः प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाकडून राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने महाराष्ट्रातून …

Leave a Reply