Breaking News

अत्याचारप्रकरणी सावत्र पित्याला आजन्म कारावास

अलिबाग : प्रतिनिधी : अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी सावत्र पित्याला अलिबाग येथील जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवून आजन्म कारावास अशी शिक्षा सुनावली.

सगीर मोहम्मद खान असे या आरोपीचे नाव असून हा खालापूर तालुक्यातील आहे. त्याने 15 फेब्रुवारी 2015 ते 25 जून 2016 या कालावधीत या अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केला. ही बाब पिडीत मुलीच्या आईच्या लक्षात आल्यावर तिने खालापूर पोलीस ठाण्यात सगीर खान याच्याविरोधात तक्रार केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेऊन तपास पूर्ण करून त्याच्या विरोधात सत्र न्यायालयात दोषारोप दाखल करण्यात आले होते.

या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एम. मोहिते यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अ‍ॅड. अश्विनी बांदिवडेकर-पाटील यांनी सात साक्षीदारांची साक्ष नोंदविली. उलट तपासणीत आरोपीच्या भावाने उत्तर प्रदेशमधील जमीन नावावर करण्याचे अमिष दाखवून साक्ष फिरविण्यास सांगितले होते. त्यामुळे या केसमध्ये फिर्यादी व पिडीत मुलगी फितूर झाल्या होत्या. परंतु उलट तपासणीत आरोपीने वारंवार अत्याचार केल्याचे कबूल केले. अ‍ॅड. अश्विनी बांदिवडेकर यांनी न्यायालयासमोर केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून सत्र न्यायालयाने आरोपी सगीर मोहम्मद खान याला दोषी ठरवून  आजन्म कारावास, तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

Check Also

पनवेलच्या ग्रामीण भागात सभापती, उपसभापतींचा अधिकाऱ्यांसमवेत दौरा

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाची सत्ता जाऊन प्रथमच भारतीय जनता पक्षाचा …

Leave a Reply