Breaking News

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान; प्रशासन सज्ज

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात 10 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित 78 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. 15) मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत व्हावी यासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020मध्ये मुदत संपलेल्या जिल्ह्यातील व सार्वत्रिक निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या एकूण 88 आहे. त्यापैकी 10 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने 78 ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया होणार आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल, तर कोरोनाबाधित मतदारांनाही मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. कोरोनाबाधित आणि विलगीकरणातील व्यक्ती तसेच दोनदा तपासणीनंतरही शरीराचे तापमान विहित निकषांपेक्षा जास्त असलेल्या मतदारांना मतदानाची वेळ संपण्याच्या अर्धा तास आधी मतदान करता येणार आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण 299 मतदान केंद्र असून, मतदारांची संख्या एक लाख 77 हजार 383 एवढी आहे. यामध्ये 86 हजार 633 महिला, 90 हजार 748 पुरुष आणि इतर दोन यांचा समावेश आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी आपला मतदानाचा हक्क जरूर बजावावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या निवडणुकीची मतमोजणी 18 जानेवारीला होणार आहे.

1588 उमेदवार रिंगणात

78 ग्रामपंचायतींसाठी होत असलेल्या निवडणुकीत 1588 उमेदवार रिंगणात आहेत. अलिबाग तालुक्यात 80, पेण 110, पनवेल 432, उरण 172, कर्जत 181, रोहा 374, माणगाव 58, महाड 76, श्रीवर्धन 73, म्हसळा 32 असे एकूण 1588 उमेदवार आपले राजकीय नशीब आजमावित आहेत.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply