Breaking News

गव्हाण विद्यालयात स्टँडर्ड क्लबची स्थापना

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारताचे नामांकन ब्युरो (ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड) ह्या उत्पादने प्रमाणित करणार्‍या भारत सरकारच्या अखत्यारीतील ग्राहक कल्याण, अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाच्या वतीने येथील रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांमध्ये प्रमाणित उत्पादना संदर्भात जनजागृती करण्यासाठी ’स्टँडर्ड क्लब’ची स्थापना करण्यात आली असून या क्लबच्या वतीने विविध उपक्रमांचा प्रारंभ झाला.बी.आय.एस.(ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड)च्या वतीने उत्पादित मालांचे प्रमाणिकरण अर्थात मानांकन देण्यात आलेल्या वस्तू खरेदी करताना गुणवत्ते संदर्भातली इत्यंभूत माहिती विद्यार्थ्यांमध्ये व त्यांच्यामार्फत पालकांमध्ये प्रसारीत व्हावी या उद्देशाने संस्थेच्या वतीने शालेय स्तरावर विविध उपक्रम राबविले जातात. विद्यार्थी व त्यांच्यामार्फत पालकांमध्ये जाणीव जागृती व्हावी यासाठी संस्थेच्या वतीने गव्हाण बी.आय.एस.च्या वतीने विद्यालयामध्ये एक स्टँडर्ड क्लब स्थापन करण्यात आला असून या विभागाच्या मार्फत विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती बी.आय.एस.चे वैज्ञानिक तथा उपसंचालक आशिष प्रभाकर वाकले व एक्सटेंडेड प्रमोशन ऑफिसर पुष्पेन्द्र मिश्रा यांनी सांगितले. गव्हाण विद्यालयात स्थापन करण्यात आलेल्या ’स्टँडर्ड क्लब’च्या मेंटार अर्थात प्रमुखपदी विद्यालयातील ज्येष्ठ विज्ञान अध्यापिका योगिता पाटील यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचा विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विद्यालयाच्या अटल टिंकरिंग प्रयोगशाळेमध्ये झालेल्या या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य प्रमोद कोळी, उपशिक्षक सागर रंधवे व विद्यार्थ्यी उपस्थित होते. स्टँडर्ड क्लबच्या वतीने ’भारतीय मानक ब्युरो अंतर्गत गुणवत्ता मूल्यमापन’ या सदरात अनेक उपक्रम राबविले जाणार असून त्याचा प्रारंभ  गुणवत्ता मूल्यांकन लेखन स्पर्धे अंतर्गत ’घरगुती वापराच्या कुकरची गुणवत्ता’ या विषयावर हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करून करण्यात आला.

Check Also

खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …

Leave a Reply