Breaking News

फुंडे येथील वीर वाजेकर महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी

उरण ः प्रतिनिधी

रयत शिक्षण संस्थेचे वीर तु. ह. वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय आणि महाविद्यालयात आज बुधवार (दि. 26) राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

इयत्ता दहावी ‘अ’ च्या वर्गाने हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टरित्या साजरा केला. विद्यालयाचे चेअरमन कृष्णाजी कडू, प्राचार्य एम. एच. पाटील, पर्यवेक्षक जी. सी. गोडगे, व्ही. के. कुटे, आर. बी. गिर्हे, एस. टी. म्हात्रे, एस. डी. म्हात्रे, एस. एल. गावंड यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

प्रतिमा पूजनानंतर इयत्ता दहावी ‘अ’मधील विद्यार्थिनींनी अंकिता सोनावणे,  अपर्णा घेरडे आणि हर्षली पाटील  यांनी अनुक्रमे मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयातून शाहू महारांजाच्या कार्यावर आधारित आपले

विचार मांडले. त्यानंतर मराठी विषयाचे एस. टी. म्हात्रे यांनी आपल्या भाषणातून शाहू महाराजांच्या कार्याची माहिती सांगितली.

महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराजाच्या प्रतिमेचे भावना घाणेकर, प्रदीप पाटील, प्राचार्य डॉ. गोरख सांगळे यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी डॉ. सांगळे यांनी शाहू महाराजांच्या राजकीय कारकिर्दीतले किस्से सांगून भारतातील असा हा पहिला राजा आहे की ज्याने वंचित समाजाला आरक्षण देण्याचा प्रस्ताव तयार केला. आपल्या राज्यात एका दलिताला हॉटेल काढायला सांगून राजे स्वतः त्या हॉटेलमध्ये सामाजिक विरोध असतानाही सहकुटुंब चहा घेण्यासाठी जात असत, जेणेकरून समाजातील अस्पृश्यता नष्ट व्हावी, हा महाराजांचा यामागचा उदात्त हेतू होता. समाजातील अस्पृश्यता दूर करण्यासाठीचे व वंचितांच्या शिक्षणासाठीचे कार्य मोठे आहे. राजे असूनही त्यांनी समाजात  समानता यावी, यासाठी खूप मोठे काम केले, अशाप्रकारे महाराजांनी समाजातील अनिष्ट चाली बदलण्याचा प्रयत्न त्यावेळी केला होता. या दोन वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी विद्यालयातील व महाविद्यालयातील प्राध्यापक, सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply