Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान

सेऊल : वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दक्षिण कोरियाच्या कल्चरल फाऊंडेशनतर्फे सेऊल शांतता पुरस्कार प्रदान शुक्रवारी (दि. 22) करण्यात आला. वैश्विक शांतता आणि गरीब आणि श्रीमंतांमधील दरी कमी करण्यासाठी केलेल्या कार्यासाठी मोदींना हा पुरस्कार जाहीर झाला होता. पुरस्कारासोबत एक कोटी 30 लाखांची रक्कम देण्यात आली आहे. पुरस्काराची रक्कम नमामि गंगा योजनेला देणार असल्याचे मोदींनी या वेळी जाहीर केलेे.

पुरस्कार मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी आपल्या मनोगतात दहशतवादावर भाष्य केले. सेऊल ऑलिम्पिकच्या काही आठवडे आधी अल कायदा नावाची संघटना उदयास आली. आज दहशतवाद आणि धर्मांध शक्तींचा वाढता प्रभाव जगासाठी धोकादायक ठरत आहे. शांतता, सुरक्षेला मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत दहशतवाद मिटवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. द्वेष नष्ट करून शांतता नांदावी यासाठी हाच एकमेव मार्ग आहे, असे मोदींनी या वेळी सांगितले.

हा पुरस्कार माझा वैयक्तिक नसून सर्व भारतीयांचा आहे. गेल्या पाच वर्षांत भारताने जे यश मिळवले त्याचा सन्मान आहे. महात्मा गांधी यांची 150वी जयंती साजरी झाली त्याच वर्षी हा पुरस्कार मिळणे माझे भाग्य आहे.
-नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply