Breaking News

पनवेल मनपा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी दिनेश खानावकर

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिका भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी नावडे येथील युवा नेते दिनेश रवींद्र खानावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते दिनेश खानावकर यांना कामोठे येथे झालेल्या कार्यक्रमात नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, अमर पाटील, राजू बनकर आदी उपस्थित होते.

या नियुक्तीबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी दिनेश खानावकर यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

दिनेश खानावकर डॅशिंग कार्यकर्ता म्हणून ओळखले जातात. त्यांचा जनसंपर्क दांडगा असून, समाजोपयोगी उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply