Breaking News

हा कसला बॉस, याची हुकूमत मर्यादित! ; रमीझ राजा यांची ख्रिस गेलवर जोरदार टीका

लंडन : वृत्तसंस्था

विश्वचषक स्पर्धेच्या 34व्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर 125 धावांनी विजय मिळवला. या स्पर्धेत विंडीज संघाचा हा पाचवा पराभव आहे. त्यामुळे त्यांच्यावर चहुबाजूने टीकेचा अक्षरक्ष: वर्षाव होत आहे. दरम्यान, माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू व क्रिकेट समीक्षक रमीझ राजा यांनी धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलवर जोरदार टीका केली आहे.

चेंडू स्टेडिअमबाहेर टोलावण्यात पटाईत असलेल्या ख्रिस गेलला संपूर्ण क्रिकेट विश्व ‘युनिव्हर्सल बॉस’ म्हणून ओळखते, परंतु हा कसला युनिव्हर्सल बॉस त्याची ही बॉसगिरी फक्त क्रिकेट लीग स्पर्धांपुरतीच मर्यादीत आहे. सपाट खेळपट्ट्या, लहान मैदाने व नवख्या गोलंदाजांसमोर ख्रिस गेल आपली बॅट गरगर फिरवतो, मात्र विश्वचषक स्पर्धेत जेव्हा त्याच्यासमोर जसप्रित बुमरा, मिचेल स्टार्क, जोफ्रा आर्चर, लसिथ मलिंगा यांसारखे दर्जेदार गोलंदाज येतात तेव्हा सुपरहिरो थॉरच्या हातोड्यासारखी चालणारी त्याची बॅट थंड पडते. गेल अगदी बेभरवशी फलंदाज आहे. त्याच्यातली अफाट क्षमता, जिद्द व महत्त्वाकांक्षा केवळ तो क्रिकेट लीग स्पर्धांसाठीच राखून ठेवतो. गेलने आजवर तीन विश्वचषक स्पर्धा खेळल्या आहेत. त्यामुळे त्याच्या अनुभवाचा फायदा विडींज संघाला होणे अपेक्षित होते, मात्र त्यातही तो अपयशी ठरला, अशा शब्दांत त्याच्यावर रमीझ राजा यांनी कडाडून टीका केली. राजा यांनी ख्रिग गेल व्यतिरिक्त विंडीज संघाच्या क्रिकेटप्रेमावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या मते विंडीजने आजवर विव रिचर्ड, गारफिल्ड सोबर्स, मॅलकम मार्शल, ब्रायन लारा यांसारखे अनेक दर्जेदार खेळाडू क्रिकेटविश्वाला दिले. या खेळाडूंचा खेळ इतका आक्रमक होता की ते आपल्या प्रतिस्पर्ध्यांना जागेवरून हलण्याचीही परवानगी देत नसत, परंतु आताचे विंडीज खेळाडू पाहिले की त्यांच्या क्रिकेट प्रेमावरच शंका घ्यावीशी वाटते.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply