श्रीवर्धन : प्रतिनिधी
जीवना येथील साईस्टार ग्रुपच्या वतीने आयोजिींत नगराध्यक्ष चषक पावसाळी क्रिकेट स्पर्धेत इरफानिया अडखळ आंजर्ले या संघाने विजेतेपद पटकाविले. दर्यावर्दी श्रीवर्धन संघ उपविजेता ठरला.
मालिकावीर तुषार (दर्यावर्दी) उत्कृष्ट फलंदाज इमरान, उत्कृष्ट गोलंदाज फजल, सामनावीर इमरान आणि शिस्तबद्ध संघ म्हणून रॉकस्टार जीवना यांची निवड करण्यात आली. विजेते संघ आणि उल्लेखनीय कामगिरी करणार्या खेळाडूंना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
या वेळी नगराध्यक्ष नरेंद्र भुसाने, डॉ. अबू राऊत, चंद्रकांत वाघे, काशिनाथ चुनेकर, मोहन वाघे, महेश चोगले, अशोक चुनेकर, कृष्णा पाटील, अरुण कालेकर, हरिश्चंद्र चुनेकर, परशुराम वाघे आदी उपस्थित होते.