कर्जत ः बातमीदार
कर्जत येथील भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेले बालाजी राऊत यास लाचलुचपत विभागाने 25 हजारांची लाच स्विकारताना अटक केली आहे. कळंब येथील जमिनीची मोजणी करण्याकरिता तक्रारदाराने कर्जत भूमी अभिलेख विभागातील अर्ज केला होता. या कार्यालयात भूकरमापक बालाजी रावसाहेब राऊत यांनी तक्रारदाराकडे दीड लाखांची मागणी केली. या संदर्भात तक्रारदाराने सोमवारी (दि. 11) अलिबाग येथील लाचलुचपत विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचून बुधवारी (दि. 13) बालाजी रावसाहेब राऊत याला दीड लाखांपैकी 25 हजारांची लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले.