Breaking News

पनवेलमध्ये लवकरच ‘मेट्रो’

शहर ट्रेनने विमानतळाला जोडण्याचे विकास आराखड्यात नियोजन

टपाल नाका ते रेल्वेस्थानकदरम्यानही धावणार

पनवेल ः बातमीदार – पनवेल महापालिकने 2045 सालापर्यंतचा केलेल्या प्रस्तावित नियोजन आराखड्यात ‘मेट्रो’चाही समावेश केला असून प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला पनवेल शहर मेट्रोने जोडण्यात येणार आहे. यासाठीचे विशेष काम सध्या नियोजन विभागात सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नियोजनानुसार शहरातील टपाल नाका ते पनवेल रेल्वेस्थानक या दरम्यान शहराच्या मुख्य रस्त्यावरून ‘मेट्रो’ धावणार आहे. सुमारे सहा किलोमीटर अंतरापर्यंत या मेट्रोचा प्रस्तावित आराखडा बनविण्याचे पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या विचाराधीन आहे, अशी माहितीही उपलब्ध झाली आहे.

पनवेल शहर पालिकेच्या क्षेत्रामध्ये खांदेश्वर, कामोठे, कळंबोली व तळोजा औद्योगिक क्षेत्र तसेच खारघर या वसाहतींमध्ये‘मेट्रो’चे जाळे उभारले जात आहे. हे नियोजन सिडको मंडळाचे आहे. पालिकेच्या शहरी भागाप्रमाणे पनवेल शहरातील नागरिकांच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी ‘मेट्रो’चा पर्याय असावा, अशी मागणी होत आहे. सिडको मंडळाने मेट्रोच्या तिसर्‍या टप्प्यामध्ये खांदेश्वर रेल्वेस्थानक ते आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पापर्यंत मेट्रोचा मार्गिका सुचविली आहे. याच मार्गिकेला कळंबोली व तळोजापर्यंत जोडले जाणार आहे. याच मार्गिकेचा चौथा टप्पा पनवेल शहरातील टपाल नाकापर्यंत किंवा पनवेल रेल्वे स्थानकापर्यंत जोडला जावा, असे नियोजन सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सिडको मंडळ आणि राष्ट्रीय रस्ते व राज्य सरकारचे रस्ते बांधणार्‍या विविध प्राधिकरणांकडून पनवेल शहरालगत जाणार्‍या महामार्गांना पनवेल शहराला जोडण्याच्या हालचाली आयुक्त देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन प्राधिकरण करीत आहेत. पनवेल शहरालगत जेएनपीटी, दादरी फ्रेटकोरीडोर, विरार-पनवेल कोरीडोर, सीएसटी-पनवेल इलीव्हेटेड रेल्वेमार्ग आणि सिडकोचा मेट्रो प्रकल्प पनवेल शहर पालिकेचा भाग असल्याने भविष्यात पनवेलमधील दळणवळण सुटसुटीत व जलद असेल. मेट्रोच्या आराखड्याचा प्रारूप तयार होण्यासाठी 2019 सालची अखेर उजडेल. नगरविकास विभागाच्या मान्यतेनंतर नियोजन आराखड्याची अंमलबजावणी होणार आहे.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply