Breaking News

भारतीय हॉकी संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल ; वंदना कटारियाची विक्रमी हॅट्ट्रिक

टोकियो ः वृत्तसंस्था

भारतीय महिला हॉकी संघाने पूल ‘ए’च्या शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 4-3 असा पराभव केला. भारतासाठी वंदना कटारियाने तीन आणि नेहा गोयलने एक गोल केला. वंदना ही ऑलिम्पिक सामन्यात हॅट्ट्रिक करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. दरम्यान, भारतीय हॉकी संघ पुढील फेरीत जाण्याच्या आशा अजूनही जिवंत आहेत. जर ब्रिटनने आयर्लंडला हरवले, तर भारत उपांत्यपूर्व फेरी गाठेल. वंदना कटारियाने पहिल्या क्वार्टरमध्ये भारताला शानदार सुरुवात करून दिली आणि चौथ्या मिनिटाला गोल केला, मात्र दक्षिण आफ्रिकेने पहिल्या क्वार्टरच्या शेवटच्या क्षणात बरोबरी साधली. दुसर्‍या क्वार्टरमध्येही वंदनाने आक्रमक खेळ दाखवत स्कोअर 2-1 असा केला. दक्षिण आफ्रिकेने मात्र भारताच्या अत्यंत कमकुवत संरक्षण रेषेला दुसर्‍यांदा छेद दिला. पूर्वार्धात सामना 2-2 असा बरोबरीत होता. तिसर्‍या क्वार्टरमध्ये नेहा गोयलच्या गोलच्या मदतीने भारताने पुन्हा एकदा जबरदस्त सुरुवात केली आणि आघाडी 3-2 अशी वाढवली, पण दक्षिण आफ्रिकेने जबरदस्त पुनरागमन केले आणि तिसरा गोल केला. सामन्याच्या 49व्या मिनिटाला कटारियाने तिसरा गोल करीत भारताला 4-3 अशी आघाडी मिळवून दिली. सलग दुसर्‍यांदा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या भारतीय संघाने रिओ ऑलिम्पिकमध्ये 12वे स्थान मिळवले होते. यंदा पहिल्या तीन सामन्यांमध्ये भारताला जागतिक नंबर वन नेदरलँड्सने 5-1, जर्मनीने 2-0 आणि गतविजेता ब्रिटनने 4-1ने पराभूत केले. चौथ्या सामन्यात नवनीत कौरच्या गोलमुळे भारताने आयर्लंडचा 1-0 असा पराभव केला.

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply