Breaking News

गोमूत्र शिंपडण्यापेक्षा रोजगार निर्माण करा : ना. नारायण राणे

मुंबई ः प्रतिनिधी
केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांची मुंबईत जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे. या यात्रेदरम्यान ते वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत आहेत. राणे यांनी राज्यात आणि मुंबई महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे, तर गोमूत्र शिंपडण्यावरून निशाणाही साधला.
‘वीजपुरवठा नाही राज्यात म्हणून 350 कंपन्या बंद आहेत. मी प्रयत्न करणार, इथल्या मंत्र्यांशीही बोलणार. 350 कंपन्या बंद असल्याने तीन लाख कामगार आज बेरोजगार झाले आहेत. गोमूत्र शिंपडणार्‍यांना माहिती नाही. ते शिंपडत राहण्यापेक्षा रोजगार द्या. नको उद्योग करण्यापेक्षा हवे ते व्यवसाय करावे. राज्यातील युवकांना रोजगार द्यावा. त्यांची आर्थिक स्थिती मजबूत करून द्या. देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हातभार लावावा’, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली.
या वेळी ना. राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाने मी केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी झालो आहे. मी मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचा ऋणी आहे की त्यांनी मला दिल्लीत मंत्रिमंडळात जाण्याची संधी उपलब्ध करून दिली, असे ते म्हणाले.

Check Also

खासदार श्रीरंग बारणे यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करा

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त पिंपरी-चिंचवडकर खासदार श्रीरंग बारणे …

Leave a Reply