Breaking News

उच्चशिक्षण पदवी महत्त्वाची -संदीप गांगल

रोहे : प्रतिनिधी

जीवनात उच्च शिक्षणाबरोबरच उच्च शिक्षणातील पदवीही महत्त्वाची असते, असे प्रतिपादन संदीप गांगल यांनी येथे केले.कोएसोच्या रोहे येथील डॉ. चिंतामणराव देशमुख वाणिज्य व सौ. कुसुमताई ताम्हाणे कला महाविद्यालयाच्या पदवी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात संदीप गांगल उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. त्यात तृतीय वर्ष वाणिज्य शाखेतील 94, कला शाखेतील 28, द्वितीय वर्ष एमएचे तीन आणि द्वितीय वर्ष एमकॉमचे 12  आशा एकूण 137 विद्यार्थांचा समावेश होता.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तुलशीदास मोकल यांनी केले.  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल साळुंके यांनी प्रास्ताविकात मुंबई विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्र कार्यक्रमाची सुरुवात का केली याची माहिती दिली. यावेळी निवडक विद्यार्थांनी आपल्या मनोगतात  प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचार्‍याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.   महाविद्यालय विकास समिती सदस्य लिलाधर थोरवे, अमित आठवले, प्रा. सुकुमार पाटील, प्रा. सीमा भोसले, प्रा. डॉ. कमलाकर कांबळे, प्रा. अनंत थोरात, प्रा. डॉ. नितीन मुटकुळे, प्रा. डॉ. सम्राट जाधव व प्रा. अनिल शिंदे यांच्यासह 250 आजी-माजी विद्यार्थी आणि पालक या कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रा.अनिल शिदें यांनी आभार मानले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply