Breaking News

महाआघाडीचे तीनचाकी सरकार चालणे कठीण, देवेंद्र फडणवीस यांचे भाष्य; मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

मुंबई : प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने आमच्याकडे बहुमत उरले नाही. त्यामुळे मी राज्यपालांना भेटून राजीनामा देत आहे, अशी घोषणा करतानाच महाआघाडीचे तीनचाकी सरकार चालणे कठीण असल्याचे भाष्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मंगळवारी

(दि. 26) भरगच्च पत्रकार परिषदेत केले. त्यानंतर त्यांनी राज्यपालांना भेटून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सादर केला.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी ते म्हणाले की, जनादेशाचा सन्मान करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. जे ठरले ते देऊ, जे ठरले ते देणार नाही हे आम्ही शिवसेनेला सांगितले. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देऊ असे कधीच ठरले नव्हते. शिवसेनेने आकडे बघून बार्गेनिंग सुरू केले. आमच्याशी चर्चा करण्याऐवजी ते काँग्रेस, राष्ट्रवादीशी चर्चा करीत राहिले. जे लोक ‘मातोश्री’वरून बाहेर पडत नव्हते, ते अनेकांच्या पायर्‍या झिजवू लागले. महाविकास आघाडीचा कॉमन मिनिमम प्रोग्रॅम हा भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी होता. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतरही शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांचे

चर्चेचे गुर्‍हाळ सुरूच होते. त्यामुळे अजित पवार यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि आम्हाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पाठिंब्यामुळे आम्ही सरकार बनवले. त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश आम्हाला दिले, मात्र सकाळी अजित पवार मला भेटले आणि त्यांनी काही कारणामुळे राजीनामा देत असल्याचे सांगितले. अजित पवार यांनी माझ्याकडे उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आमच्याकडे संख्याबळ उरले नसल्याने मीही राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

इतका मोठा विरोधाभास असल्याचे सरकार राज्यात सत्तेत येणार आहे. दोन चाके असणारे वाहन धावते, पण तीनचाकी ऑटो रिक्षाप्रमाणे असणार्‍या या सरकारची चाके तीन दिशेला धावली तर काय होईल? असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.

आम्ही आमदार फोडणार नाहीत, हे आधीच सांगितले होते. आम्हाला कोणताही घोडेबाजारही करायचा नाही. केवळ राष्ट्रवादीचा गट आमच्याकडे आल्याने आणि संख्याबळ असल्यामुळेच आम्ही सत्ता स्थापन केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला जनादेश दिला. शिवसेनेपेक्षा भाजपला जनादेश मोठा होता, असे सांगून फडणवीस यांनी पाच वर्षे साथ दिल्याबद्दल जनतेचे, अधिकार्‍यांचे तसेच सहकार्‍यांचेही आभार मानले.

भाजप जनतेचा आवाज बनेल

नवे सरकार स्थापन करणार्‍यांना माझ्या शुभेच्छा आहेत, मात्र हे सरकार आपल्याच ओझ्याखाली दबेल. कालच मी बघितले जेव्हा शिवसेनेचे नेते सोनिया गांधींची शपथ घेत होते. सत्तेसाठी किती मोठी लाचारी शिवसेनेच्या नेत्यांना स्वीकारावी लागली आहे. त्यांची लाचारी त्यांना लखलाभ, पण भाजप आता राज्यात प्रखर विरोधी पक्षाचे काम करेल. जनतेचा आवाज बनून जनतेला न्याय देण्याचे काम आम्ही करू, असा निर्धार देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

– राजकीय संन्यास घेण्याच्या अटीवर

अजितदादांची माघार?

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपला साथ देऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी त्यांनी पदाचा राजीनामा दिला. राजकीय संन्यास घेण्याच्या अटीवर त्यांनी राजीनामा दिल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते त्यांच्या मनधरणीसाठी प्रयत्न करीत होते, मात्र पवार यांनी त्याबाबत काहीही स्पष्ट केले नव्हते. अखेर मंगळवारी दुपारी त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला. राजकीय संन्यास घेण्याच्या अटीवर त्यांनी राजीनामा दिल्याचे म्हटले जात आहे.

– विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती

राज्य विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोळंबकरांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदासाठी विधानसभा सचिवांकडे बाळासाहेब थोरात, के. सी. पाडवी आणि  कालिदास कोळंबकर या विधानसभेच्या तीन सदस्यांची नावे आली होती. त्यापैकी ज्येष्ठ सदस्य म्हणून कोळंबकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला जनादेश दिला. शिवसेनेपेक्षा भाजपला जनादेश मोठा होता, असे सांगून फडणवीस यांनी पाच वर्षे साथ दिल्याबद्दल जनतेचे, अधिकार्‍यांचे तसेच सहकार्‍यांचेही आभार मानले.

भाजप जनतेचा आवाज बनेल

नवे सरकार स्थापन करणार्‍यांना माझ्या शुभेच्छा आहेत, मात्र हे सरकार आपल्याच ओझ्याखाली दबेल. कालच मी बघितले जेव्हा शिवसेनेचे नेते सोनिया गांधींची शपथ घेत होते. सत्तेसाठी किती मोठी लाचारी शिवसेनेच्या नेत्यांना स्वीकारावी लागली आहे. त्यांची लाचारी त्यांना लखलाभ, पण भाजप आता राज्यात प्रखर विरोधी पक्षाचे काम करेल. जनतेचा आवाज बनून जनतेला न्याय देण्याचे काम आम्ही करू, असा निर्धार देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply