मुंबई ः प्रतिनिधी
आयपीएलच्या यंदाच्या पर्वात गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 9 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी चेन्नईत होणार आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी मुंबई इंडियन्सला पराभूत करणे खूप कठीण असेल, असे म्हटले आहे.
मुंबई इंडियन्स हा इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये सर्वांत बलाढ्य संघ मानला जातो. रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणार्या या संघाने आयपीएलची पाच विजेतेपदे नावावर केली आहे, तर मागील वर्षी दिल्लीला नमवून त्यांनी सलग दुसर्या विजेतेपदावर नाव कोरले. आता ते विजेतेपदाची हॅट्ट्रिक साजरी करण्यासाठी यंदा रिंगणात उतरणार आहेत. दरम्यान, मुंबईकर आणि भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी यंदाची आयपीएल मुंबईसाठी कशी असेल याविषयी मत दिले आहे.
गावसकर म्हणाले, मला वाटते की, मुंबई इंडियन्सला पराभूत करणे खूप कठीण असेल. आम्ही या संघाचे खेळाडू तयार होताना पाहिले आहेत. ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी यांचा फॉर्म भन्नाट आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत भाग घेणार्या मुंबई इंडियन्समधील खेळाडूंनी आपण चांगल्या लयीत असल्याचे दाखवून दिले आहे.
दुखापतीतून सावरून इंग्लंडविरुद्ध दमदार कामगिरी करणार्या हार्दिक पांड्याविषयी गावसकर यांनी सांगितले की, हार्दिक पांड्या आता नऊ षटके टाकण्यास सक्षम आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जूनमध्ये होणार आहे. या स्पर्धेला वेळ आहे, तरीही हार्दिकची कामगिरी मुंबई व भारतीय क्रिकेटसाठी चांगली आहे.
Check Also
यशाचा सोहळा; सामना, बनवाबनवी, माहेरची साडी… आणि ‘देऊळ बंद २’चा
यश हे सर्वाधिक ताकदवान टॉनिक… चित्रपटाच्या जगात यशाचे नाणं कायमच चालणारं. सर्वांनाच हवेहवेसे वाटणारे. जपून …
RamPrahar – The Panvel Daily Paper