Breaking News

मिनीट्रेनच्या प्रदर्शनीय इंजिनाला नवा साज

कर्जत : बातमीदार

शतकमहोत्सव साजरा करणार्‍या नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेनचे सुरुवातीच्या काळात चालविले जाणारे इंजिन नेरळ स्थानकात प्रदर्शनार्थ ठेवण्यात आले आहे. त्या वाफेवर चालविल्या गेलेल्या इंजिनाला नवीन साज देण्यात आला आहे.नेरळ-माथेरान-नेरळ ही मिनीट्रेन 1907 मध्ये चालविण्यास सुरुवात झाली. त्यावेळी मिनीट्रेनसाठी कोळशापासून तयार होणार्‍या वाफेवर चालणारी चार इंजिने जर्मनीमधून आणण्यात आली होती. त्यापैकी तीन इंजिनाना रेल्वे प्रशासनाने प्रदर्शनार्थ ठेवण्याचा निर्णय 1980 मध्ये घेतला होता. त्यातील एनडीएम 793 बी हे इंजिन नवी दिल्ली येथील रेल भवन बाहेर उभे करण्यात आले आहे. तर एनडीएम 739 बी हे इंजिन माथेरान रेल्वे स्थानकात पर्यटकांसाठी कायम स्वरूपी प्रदर्शनीय म्हणून ठेवण्यात आले आहे. एनडीएम 794 बी हे इंजिन नेरळ रेल्वे स्थानकात प्रदर्शनार्थ ठेवण्यात आले आहे, तर एनडीएम 738 बी या इंजिनाचे रेल्वे अभियंत्यांनी डिझेलमध्ये रूपांतरित करून आजही वापरात ठेवले आहे. मध्य रेल्वेच्या काही खास फेर्‍यांसाठी ते इंजिन मिनीट्रेनला  लावण्यात येते.नेरळ रेल्वे स्थानकात प्रदर्शनार्थ  ठेवण्यात आलेल्या एनडीएम 794 या इंजिनाला नवीन साज देण्याचे काम मध्य रेल्वेने केला आहे. या इंजिनाला निळा रंगाने नव्याने रंगविण्यात आले असून रात्रीच्या अंधारातदेखील पर्यटक आणि प्रवासी यांचे लक्ष केंद्रित व्हावे, यासाठी त्या इंजिनाला एलईडी लाईट्स लावण्यात आल्या आहेत. त्याचवेळी परिसर बगीचा उभारून हिरवागार करण्यात आला आहे. त्यामुळे ते इंजिन गेल्या काही दिवसांपासून पर्यटक आणि प्रवाशी यांच्यासाठी सेल्फी पॉईंट बनले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply