Breaking News

निरोगी जीवनासाठी योगा उपयुक्त -डॉ. हेमलता वैशंपायन

उरण : वार्ताहर – निरोगी जीवनासाठी योगा उपयुक्त असून योगामुळे ताणताणाव दूर होऊन मानसिक संतुलन कायम राखण्यासाठी मदत होते. त्यासाठी सर्वांनी नियमित योगासने करावीत. त्यामुळे आपले शरीर निरोगी होतेच त्याचप्रमाणे एकाग्रता वाढते. आहार व नियमित योगा हे महत्त्वाचे आहे. शारीरिक व मानसिक लाभ होतो. त्याचप्रमाणे महिलांनी आपल्या आहारात लक्ष ठेवले पाहिजे, असे मोलाचे मार्गदर्शन डॉ. हेमलता वैशंपायन यांनी योग प्रशिक्षण शिबिराच्या सांगता समारोप कार्यक्रमात केले.

21 जून हा दिवस संपूर्ण देशात व जगभरात ‘जागतिक योग दिवस’ म्हणून साजरा केला जातो. उरण नगर परिषदेच्या महिला बालकल्याण व स्वास्थ समितीच्या वतीने 21 जून रोजी ‘जागतिक योग दिन निमिताने दि. 21 ते दि. 29 पर्यंत योग प्रशिक्षण शिबिर नगर परिषदेच्या डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी शाळेत आयोजित करण्यात आले. उरण नगर परिषद मुख्याधिकारी अवधूत तावडे, नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर योग शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या वेळी नगराध्यक्षा सायली सविन म्हात्रे, महिला बालकल्याण व स्वास्थ समिती सभापती आशा शेलार, नगरसेविका स्नेहल कासारे, नगरसेविका जान्हवी पंडित, नगरसेविका रजनी कोळी, नगरसेविका दमयंती म्हात्रे, प्रियंका पाटील, योग प्रशिक्षक डॉ. हेमलता वैशंपायन, संपूर्णा थळी, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या उरण नगर परिषदेकडील क्षेत्रीय समन्वयक कविता म्हात्रे व कर्मचारी संजय पवार व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Check Also

मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले

मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …

Leave a Reply