Breaking News

रोटरी क्लब आणि इंडियन मेडिकल असोशिएशनचा उपक्रम कौतुकास्पद -संजय कुमार

पनवेल : वार्ताहर – पोलीस अधिकारी, कर्मचारी त्याचप्रमाणे त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल व इंडियन मेडिकल असोशिएशनच्या मार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिर व औषधांचे वाटप हा उपक्रम राबविण्यात येत असून हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी आज पनवेल तालुका पोलीस ठाण्यात आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी केले.

यावेळी नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्यासह सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल धामगुडे, रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या अध्यक्षा प्रिया पाटील, मावळते अध्यक्ष डॉ. रमेश पटेल, पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि अशोक राजपूत, वपोनि विनोद चव्हाण, वपोनि सतीश गायकवाड, आयएमए पनवेलचे अध्यक्ष डॉ. गिरीश गुणे, उपक्रमाच्या चेअर पर्सन डॉ. संजीवनी गुणे, डॉ. लक्ष्मण आवटे, रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचे सचिव सायली सातवळेकर, डॉ. संगीता घनाते, डॉ. समीर सहस्त्रबुद्धे, विनय शेलार, डॉ. नीलेश बांठिया, डॉ. अशोक सिंग, डॉ. संतोष जाधव, सी. डी. कुलकर्णी, डॉ. दादासाहेब पाटील, डॉ. जानकी पाटील, डॉ. कल्पना कुलकर्णी, डॉ. अर्चना ठोंबरे, डॉ. मंदार पुरोहित, डॉ. कुणाल माखिजा, डॉ. सौैरभ कुलकर्णी, डॉ. प्रमिला दास, डॉ. येशा त्रिवेदी, डॉ. अभय गुरसाळे, डॉ. इंगळे, डॉ. नायर, तसेच लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटचे पथक यावेळी उपस्थित होते. या वेळी 284 कर्मचारी, तसेच काही कुटुंबीयांची हिमोग्लोबिन, रक्तातील साखर, हेपिटायटीस बी या रक्ततपासण्या झाल्या. सर्वांच्या हाडांची तपासणी व स्पायरोमेचट्री तपासणी करण्यात आली, तसेच 90 टक्के लोकांची इसीजी तपासणी झाली. फिजीशियन, अस्थिरोग, नेत्ररोग, स्त्रीरोग या डॉक्टरांनी सर्व कर्मचार्‍यांचे रिपोर्ट्स पाहून व तपासून मार्गदर्शन केले. सर्वांना मोफत औषधे देण्यात आली. त्यात प्रमुख्याने कॅलशियम, आयर्न, मल्टिव्हिटॅमिन, व्हिटॅमिन डी, जंताची औषधे, आम्लपित्ताची औषधे देण्यात आली. 350 व्यक्तींना हेपिटायटीस बीचे लसिकरण कऱण्यात आले. या पद्धतीचे शिबिर करण्याचे रोटरी क्लबचे हे सातवे वर्ष असून अशा पद्धतीचा उपक्रम पुढील वर्षी यापेक्षाही मोठ्या प्रमाणात कऱण्याचा मानस या वर्षीच्या अध्यक्षा प्रिया पाटील यांनी केला.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply