कामोठे ः रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र राज्य परिषद पुणे मार्फत झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल कामोठे विद्यालयातील इयत्ता पाचवीमधील स्नेह उदय लुगडे व इयत्ता आठवीमधील विठ्ठल दिनकर पालवे, तसेच एनएमएमएस या शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता आठवीमधील विठ्ठल दिनकर पालवे, उंडे भूषण मारुती, कांबळे आदित्य सुनील हे पाच विद्यार्थी गुणवत्ता यादीत शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले.
या विद्यार्थ्यांचा सन्मान पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन विद्यालयाचे स्कूल कमिटीचे चेअरमन स्वामी अप्पा म्हात्रे, व्हा. चेअरमन सुधाकर पाटील, माजी चेअरमन बाळाराम चिपळेकर, रोटरी क्लब कामोठेचे अध्यक्ष शशिकांत म्हात्रे, रामदास पावणेकर व मुख्याध्यापक गोडसे एस. एस. यांच्या हस्ते करण्यात आला. यशस्वी विद्यार्थी, पालक यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक व विभाग प्रमुख व्ही. बी. पाटील, एस. एन. मोरे, एस. डी. थोरात, ए. पी. पाटील, आर. बी. मोरे, बी. बी. मोरे, एम. व्ही. म्हात्रे, एस. आर. ठाकूर, व्ही. ए. गांगुर्डे या सर्वांचे अभिनंदन स्थानिक स्कूल कमिटीचे सर्व पदाधिकारी व शाळेचे मुख्याध्यापक
यांनी केले.