Breaking News

इंडियन ओपन बॅडमिंटन : स्पर्धेतील सिंधूचे आव्हान संपुष्टात, लक्ष्य सेनसह सात्त्विक-चिराग अंतिम फेरीत

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या भारताच्या अग्रमानांकित पी. व्ही. सिंधूचे इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. दुसरीकडे जागतिक कांस्यपदक विजेत्या लक्ष्य सेनने पुरुष एकेरीची आणि सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीने पुरुष दुहेरीची अंतिम फेरी गाठली आहे. जागतिक क्रमवारीत 33व्या क्रमांकावर असलेल्या थायलंडच्या सुपानिडा कॅटेथाँगकडून सिंधूने 59 मिनिटे रंगलेल्या लढतीत 14-21, 21-13, 10-21 अशी हार पत्करली. त्यामुळे 2019च्या विश्वविजेत्या सिंधूचा जेतेपदाचा दुष्काळ कायम राहिला आहे. आकर्षी कश्यपची वाटचाल उपांत्य फेरीत खंडित झाली़ बुसानन ओंगबामरंगफानने आकर्षीला 26-24, 21-9 असे नामोहरम केल़े  जागतिक क्रमवारीत 17व्या क्रमांकावरील मलेशियाच्या एनजी झे यंगला 19-21, 21-16, 21-12 असे नामोहरम केले.  सात्त्विक-चिराग जोडीने फ्रान्सच्या फॅबियन डेलरूई व विल्यम व्हिलेगर जोडीला 21-10, 21-18 असे नमवले.कोरोनाची लागण आणि दुखापत या कारणास्तव स्पर्धेतील माघारसत्र शनिवारीसुद्धा कायम राहिले. मिश्र दुहेरीत रशियाच्या रोडिअन अलिमोव्हच्या कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आला. त्यामुळे द्वितीय मानांकित रोडिअन आणि अलिना डॅव्हलेटोव्हा जोडीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. कोरोना चाचणी नकारात्मक आली असली तरी कॅनडाच्या ब्रायन यंगने घसा खवखवत असल्याने उपांत्य लढतीतून माघार घेतली. त्यामुळे विश्वविजेत्या लो कीन येवने पुरुष एकेरी अंतिम फेरी गाठली.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply