Breaking News

डॉ. महेश केळुसकर सेवानिवृत्त

मुंबई : प्रतिनिधी

आकाशवाणीतील प्रदीर्घ सेवेनंतर साहित्यिक डॉ. महेश कुळुसकर सेवानिवृत्त झाले. 1983 पासून ते आकाशवाणीत कार्यरत होते. रत्नागिरी, दमण, विविध भारती, सांगली, मुंबई या केंद्रांवर काम करताना त्यांनी 26 अभिवाचन मालिका केल्या. त्यातील महानायक ही अभिवाचन मालिका खूप गाजली. त्याचबरोबर त्यांनी प्रभाते मनी, ऐसी अक्षरे रसिके, चिंतन हा चिंतामणी आदी लोकप्रिय कार्यक्रम दिले. डॉ. केळुसकर यांचे वास्तव्य ठाण्यात असून, ते कवी आणि लेखक आहेत. ‘नागरिक’ या मुलाखतविषयक लघुचित्रपटाचे त्यांनी संवाद लेखन केले आहे. डॉ. केळुसकर कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष आहेत. त्यांच्या नावावर अनेक पुस्तके असून, ‘क्रमशः’, ‘यू कॅन आल्सो विन’ या कादंबर्‍या, तर कवडसे, कवितांच्या गावा जावे, झिनझिनाट, निद्रानाश, पहारा, मस्करिका, मी आणि माझा बेंडबाजा, मोर, रोझ डे (पॉकेटबुक) आदी कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्याचबरोबर कलमबंदी (साहित्य आणि समीक्षा), जोर की लगी है यार (कथासंग्रह), भुताचा आंबा आणि इतर गोष्टी (बालसाहित्य), मधु मंगेश कर्णिक : सृष्टी आणि दृष्टी (चरित्र, व्यक्तिचित्रण, समीक्षा), व्हय म्हाराजा (ललित), साष्टांग नमस्कार (विनोदी) आदी पुस्तकेही त्यांच्या नावावर आहेत. त्यांना राज्य, तसेच राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply