रेवदंडा ः प्रतिनिधी
मुरूड तालुक्यातील शिरगाव येथे संशयातून बदनामी करून विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिरगाव येथील लॅब टेक्निशियन असलेली 22 वर्षीय विवाहित महिला प्रणाली पाटील यांच्याकडे 7 मे 2019 ते 14 एप्रिल 2020 दरम्यानच्या काळात सासरकडील कुमार पाटील, रमेश पाटील, मंजुळा पाटील, शितल सातमकर तसेच कोर्लई येथील अस्मिता महालकर, विनय महालकर यांनी वारंवार पैशांची मागणी केली. तसेच घाणेरडे संशय घेऊन शिवीगाळ व मारहाण केली. याबाबतची तक्रार रेवदंडा पोलीस ठाणे येथे विवाहित महिला प्रणाली पाटील यांनी नोंदविली आहे. त्यानुसार रेवदंडा पोलीस ठाण्यात विवाहित महिला प्रणाली पाटील यांनी नोंदविलेल्या तक्रारीनुसार शिरगाव येथील कुमार पाटील, रमेश पाटील, मंजुळा पाटील, शितल सातमकर, तसेच कोर्लई येथील अस्मिता महालकर, विनय महालकर यांच्या विरोधात भा. दं. वि. कलम 498 अ, 323, 109, 504, 506, 34प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास रेवदंडा पोलीस ठाण्याच्या महिला सहा. फौजदार सरिता गोसावी ह्या पो.नि. सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.