म्हसळा : प्रतिनिधी
केंद्र सरकारने आर्थिकदुर्बल कुटुंबांसाठी सुरू केलेल्या आयुष्मान भारत योजनेसाठी राज्यात काम सुरू आहे. जनगणनेतील सर्वेक्षणातील आर्थिकदुर्बल कुटुंबांना या योजनेंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचाराची सुविधा मिळणार आहे, मात्र राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत रायगड जिह्यात या योजनेतील लाभार्थींचे केवायसी नोंदणीचे व गोल्डन कार्ड वितरणाचे काम फार कमी झाले असल्याचे दिसते. 2011च्या जनगणनेमधील नोंदीनुसार आयुष्मान भारत योजनेसाठी रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यांमधील सुमारे एक लाख सात हजार 516 कुटुंबांतील 43 लाख चार हजार 122 लाभार्थी निवडले गेले आहेत. त्यांना स्थानिक पातळीवरील सीएससी (उेापेप डर्शीींळलश उशपींशी’ी)च्या माध्यमातून केवायसी प्रक्रिया पूर्ण करून बारकोड असलेले कार्ड दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी प्राथमिक माध्यमिक शाळा, आरोग्य केंद्र, उपकेंद्र, आशा, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या माध्यमातून आयुष्मान भारत योजनेची जनजागृती व लाभार्थ्यांशी संपर्क करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये शहरी भागातील कचरावेचक, बांधकाम मजूर, घरकाम करणारे, फेरीवाले, भिकारी आदी वर्गातील कुटुंबांचा समावेश करण्यात आला आहे, तर ग्रामीण भागामध्ये घराची भौगोलिक स्थिती, कुटुंबातील कमावत्या व्यक्ती, अनुसूचित जाती व जमाती, भूमिहीन शेतकरी आदी वर्गातील कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.