Breaking News

वृक्ष लागवडीसाठी असंख्य लोक सरसावले

मुरुड तालुका हा जंजिरा संस्थांच्या अधिपत्याखाली असणारा तालुका आहे.श्रीवर्धन म्हसळा व मुरुड हे तीन तालुके सर सिद्धी अहमद खान यांच्या ताब्यात असून त्यांचे राहण्याचे ठिकाण हे मुरुड असल्याने याच ठिकाणी नवाबांचा राजवाडा आहे. जंजिर्‍याचे नवाब म्हणून त्यांची खाती संपूर्ण जगाला होती.मुरुड तालुक्याला तसे पहाता वृक्ष लागवडीचे वेड हे नवाबाच्या काळातच लाभले आहे.कारण नवाबाने त्या काळात  वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात करून  केसवलीचे जंगल मोठ्या प्रमाणात लागवड करून तयार केले होते.आता  हेच जंगल फणसाड अभयारण्य या नावाने ओळखले जाते.

त्यामूळे मुरुडला वृक्ष लागवडीची आवड नवाब काळापासून आहे.

महाराष्ट्र शासनाने 1 जुलै ते 7 जुलै हा वृक्ष लागवड सप्ताह घोषित केल्याने मुरुड तालुक्यातील असंख्य संस्था वृक्ष लागवड करण्यात व्यस्त झाल्या आहेत.मुरुड नगरपरिषदेतर्फे सर एस.ए.हायस्कूल च्या विद्यार्थ्यांना घेऊन वृक्ष दिंडी काढून त्यामध्ये तुकारामांचे अभंग वदवून लोकांना जनजागृती करण्याचे काम केले आहे.यावेळी वृक्ष लागवडीसाठी मुरुड नगरपरिषदेने 50 हजार विविध वृक्ष खरेदी करून विविध ठिकाणी त्याचे रोपण केले.

याबाबत अधिक माहिती देताना मुरुड नगरपरिषदेचे पर्यटन व नियोजन सभापती पांडुरंग आरेकर यांनी सांगितले कि, यावेळचे वृक्ष रोपण हे आम्ही अगदी वेगळ्या पद्धतीने साजरे केले आहे.हरित सुंदर मुरुड सुंदर या ब्रीद वाक्याचा उपयोग करून आम्ही वृक्ष लागवडीची संकल्पना केली आहे. वृक्ष दिंडी,घोषवाक्य,आदी स्वरूपाचा प्रचार व प्रसार करून लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. मुरुड नगरपरिषदेमार्फत नगरपरिषदेच्या सर्व प्राथमिक शाळा, वसंतराव महाविद्यालय घनकचरा व्यस्थापन ग्राउंड,समशानभूमी,कोटेशवरी मंदिर दत्तमंदिर परिसर गर्मबि धरण आंबोली धरण आदी भागात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केल्याचे आरेकर यांनी सांगितले त्याच प्रमाणे शहरातील समुद्र किनारा या ठिकणी सुरुंच्या झाडाची लागवड आम्हाला मोठ्या प्रमाणात करावयाची आहे यासाठी किनारी भगत सुद्धा मोठी लागवड केली आहे.

एकंदर शासनाच्या वृक्ष लागवड संकल्पनेस मुरुड नगरपरिषदेने मोठा वाटा उचलून हजरोच्या संख्येने वृक्ष लागवड केली आहे.यासाठी मुरुड नगरपरिषदेच्या कर्मचारी वृंदानी मोठी मेहनत केली असल्याचे यावेळी आरेकर यांनी सांगितले.

अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स, मुरुड जंजिरा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाचे संदेश देण्यासाठी वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.वृक्ष लागवड व संवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी अंजुमन महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना  व डी. एल. एल. ई विभागाचे विद्यार्थी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शरद फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाच्या 1 जुलै ते 7 जुलै या वृक्षारोपण दिनानिमित्ताने मुरुड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायतीने आपल्या ग्रामपंचायतीच्या परिसरात तीन हजार दोनशे वृक्षांची लागवड करून या उपक्रमास मोठा हातभार लावला आहे.यावेळी ग्रामपंचायतीने आवळा, सीताफळ, शिसव, टाकला, कडुलिंब गुलमोहर, बहावा, निलगिरी, आंबा अश्या विविध वृक्षांची लागवड विविध ठिकाणी करण्यात आली. सदरची वृक्ष लागवड .

उसरोली ग्रामपंचायत सरपंच मनीष नांदगावकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आली.यावेळी नांदगाव मंडळ अधिकारी महेश निकम व इतर सर्व शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मुरुड येथील वन विभागाने सुद्धा मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे. संपूर्ण मुरुड तालुक्यात वन खात्याने 93 हजार 509 वृक्षांची लागवड करणार आहेत. याबाबत आमच्या प्रतिनिधीने मुरुड येथील वनक्षेत्रपाल प्रशांत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, मुरुड तालुक्यात आम्ही 93 हजार वृक्षांची लागवड करणार आहोत.आतापर्यंत आमची 43 हजार वृक्षांची लागवड संपन्न झाली आहे. उर्वरित 50 हजार झाडे हि कांदळवन शेक्त्राशी संबंधित असल्याने या वृक्षांची लागवड सप्टेंबर नोव्हेंबर मध्ये करण्यात येणार आहे.खैराळे भगत 5,500, पारंगखारभागात 11 हजार ,जोसरंजन भागात 12 हजार 500 तर खोकरी परिसरात 15 हजार 625 वृक्ष लागवड करण्यात अली  आहे आमच्या वन खात्याप्रमाणेच सामाजिक वन विभागाने सुद्धा हजरोची वृक्ष लागवड करून शासनाचे उचित उद्दिष्ठ साध्य करण्यासाठी महत्वाची मदत केली असल्याचे यावेळी पाटील यांनी सांगितले.यावेळी मुरुड तालुक्यातील अनेक सामाजिक संस्थांनी वृक्ष लागवड करून मुरुड तालुका

हरित करण्यासाठी महत्वाचे योगदान दिले आहे.

-संजय करडे

Check Also

खोपोलीत 106 कोटींचे ड्रग्ज जप्त

पोलिसांची कंपनीत कारवाई, त्रिकूट ताब्यात खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली पोलिसांनी ढेकू गावच्या हद्दीतील एका …

Leave a Reply