Breaking News

स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी मार्गदर्शन शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन नुकतेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह पनवेल येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे सहायक आयुक्त माधवी सुर्वे, विशेष अतिथी, पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर, बँक ऑफ महाराष्ट्र, नवीन पनवेल शाखेचे विशेष सहाय्यक व गुणवंत कामगार अरविंद मोरे, मार्गदर्शक स्पेक्ट्रम अकॅडमीचे महाव्यवस्थापक सुनील पाटील, श्वेता मोहिते, विशाल घोलप, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कामगार कल्याण अधिकारी संजय राणे, गजेंद्र आहेर, प्रवीण सकट व शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक डॉ. नीलिमा अरविंद मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बँक ऑफ महाराष्ट्राचे अरविंद मोरे, पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर, सहायक कल्याण आयुक्त  माधवी सुर्वे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्पेक्ट्रम अकादमीचे महाव्यवस्थापक सुनील पाटील यांनी सर्व स्पर्धा परीक्षेचे सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थित प्रमुख अतिथींचे स्वागत कल्याण आयुक्त माधवी सुर्वे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्र संचालक गजेंद्र आहेर यांनी केले, तर आभार कामगार कल्याण अधिकारी संजय राणे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कामगार कल्याण केंद्रप्रमुख प्रवीण सकट यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यशाळेस शेकडोंच्या संख्येने युवक उपस्थित होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply