Breaking News

नवी मुंबई येथे गौतम बुद्धांचा 30 फूट उंचीचा पुतळा

आमदार मंदाताई म्हात्रे यांनी घेतली महापौर जयवंत सुतार यांची भेट

नवी मुंबई : प्रतिनिधी  – नेरूळ से 28 येथे नवी मुंबईचे आकर्षण असलेल्या ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे 30 फूट उंचीचा शांततेचे प्रतिक असलेल्या भगवान गौतम बुद्ध यांचा ब्रांझचा पुतळा उभारण्यात यावा, याकरिता बेलापूर विधानसभेच्या आमदार . मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबईचे महापौर  जयवंत सुतार व आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची भेट घेतली.  यावेळी भगवान गौतम बुद्ध यांचा पुतळा उभारताना आजूबाजूचे सुशोभीकरण, पर्यटन स्थळाला येणारे महत्व तसेच आमदार निधीतून रु. 50 लाख रुपयांची तरतूद याबाबत चर्चा करण्यात आली. नवी मुंबईचा विकास करण्यास मी नेहमी आग्रही असल्याने सदर गौतम बुद्ध पुतळा उभारल्याने नवी मुंबईच्या विकासात भर पडत असल्याने मी सकारात्मक असून आमदार  मंदाताई म्हात्रे यांनी आपल्या आमदार निधीतून 50 लाख देण्यात येणार असल्याने महापालिकाही आग्रही असल्याचे महापौर . जयवंत सुतार यांनी सांगितले. सदरबाबत केंद्रीय मंत्री  रामदास आठवले यांजबरोबरही संपर्क केला असून येत्या 2 दिवसांत त्यांची भेट घेणार असल्याचे आमदार  मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

यावेळी आमदार  मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, नवी मुंबई शहर हे विकसित शहर असून शहरामध्ये सर्व जाती धर्माचे नागरिक कोणतेही जातीभेद न बाळगता गुण्यागोविंदाने राहतात. जगाच्या इतिहासातील महामानवांमध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जात असून सर्वच खंडात भगवान बुद्धांचे अनुयायी आहेत. नवी मुंबईचे आकर्षण असलेल्या नेरूळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे शांततेचे प्रतिक असलेल्या भगवान गौतम बुद्धांचा पुतळा उभारल्यास सदर पर्यटन स्थळाला अनन्य साधारण महत्व प्राप्त होणार आहे. सदरचा पुतळा सुमारे 30 फुट उंचीचा असून पुतळा उभारण्यास अंदाजित रु. 2 कोटी रक्कम अपेक्षित आहे. पुतळा उभारण्यास माझ्या आमदार निधीमधून रक्कम रु. 50 लाख निधी मी उपलब्ध करून देत आहे. आज नवी मुंबई महापौर  जयवंत सुतार यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले असून सदरबाबत चर्चाही करण्यात आली आहे. महापौर जयवंत सुतार यांनीही सकारात्मक पवित्रा घेतला असून नवी मुंबईच्या विकासासाठी मी आग्रही असल्याचे सांगितले. त्यामुळे लवकरच शांततेचे प्रतिक असलेल्या गौतम बुद्ध यांचा भव्य दिव्य असा 30 फुट उंचीचा पुतळा नवी मुंबईकरांच्या भेटीस येत असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply