Breaking News

चांगल्या योजनांना ब्रेक लावणारे सरकार, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची आघाडी सरकारवर टीका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

सध्याच्या राज्य सरकारमध्ये एकवाक्यता नाही. त्यामुळे हे सरकार फार काळ चालणार नाही. महायुतीच्या काळातील अनेक चांगल्या योजनांना ब्रेक लावू पहाणारे हे ब्रेक सरकार आहे. चांगल्या योजना बंद करण्याऐवजी त्यांनी त्याहून अधिक चांगल्या योजना आणून त्याची अंमलबजावणी करावी असे आवाहन

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या सरकारला दिले.

काही कार्यक्रमांनिमित्त नाशिक दौर्‍यावर आलेल्या दानवे यांनी भारतीय जनता पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, महायुतीच्या सरकारने अनेक चांगल्या योजना आणल्या. त्यांची अंमलबजावणीही सुरू केली. परंतु महाविकास आघाडीचे सरकार या योजना पुढे घेऊन जाण्याऐवजी ब्रेक करू पहाते आहे. त्यामुळे हे अमर, अकबर अँथोनींचे ब्रेक सरकार आहे. या सरकारमध्ये समाविष्ठ असलेले पक्ष आणि नेत्यांमध्ये एकवाक्यता

नाही. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज कोण व तत्सम इतिहास उकरून काढत हे सरकार बेरोजगारी, महागाई यांसारख्या प्रश्नांपासून सर्वसामान्यांचे लक्ष विचलीत करीत आहे. शेतकर्‍यांचे प्रश्न बाजूला पडत आहेत. परंतु महाराष्ट्रातील जनता सुज्ञ असून हे सरकार निराशा करत असल्याचे लोकांच्या लक्षात येईल.

त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तहसीलदाराला खुर्चीत बसविले म्हणजे राज्याचा कारभार चांगला चालतो असे होत नाही. त्यापेक्षा तहसीलदाराला त्याच्याच खुर्चीत बसू द्यावे व त्याच्याकडून चांगले काम करवून घ्यावे असा सल्ला दानवे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिला.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply