Breaking News

होम क्वारंटाइन व्यक्तींवर जिल्हा प्रशासनाची नजर

सिक्युएमएस अ‍ॅपचा वापर

अलिबाग : प्रतिनिधी – कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी प्रशासनाकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. रायगड जिल्हा प्रशासनाची वॉर रूमही दिवस-रात्र काम करीत असून तिथून होम क्वारंटाइन असलेल्या व्यक्तींवर नजर ठेवली जात आहे. त्यासाठी सिक्युएमएस या अ‍ॅपचा वापर केला जात आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात, देशात वाढू लागल्याने नोकरी-धंद्यानिमित्त बाहेर असणारे लाखो चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यांच्या येण्याने प्रशासन सतर्क झाले आहे. प्रशासनाने आलेल्या नागरिकांना होम क्वारंटाइन केले असून त्यांची मोबाइल नंबरसह पूर्ण माहिती संग्रहित केली आहे. अशा व्यक्तींवर लक्ष राहावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एक वॉर रूम तयार केली आहे. या वॉर रूममधील कर्मचारी होम क्वारंटाइन असणार्‍या व्यक्तींच्या मोबाइलवर सिक्युएमएस या अ‍ॅपची लिंक पाठवतात. हे अ‍ॅप मोबाइलवर डाऊनलोड तसेच ओटीपीद्वारे सुरू करण्यास सांगण्यात येते. त्यामुळे होम क्वारंटाइन असणार्‍या व्यक्तीच्या मोबाइलवरील जीपीएस अ‍ॅक्टिव्ह होऊन त्याच्या प्रत्येक हालचालीवर नियंत्रण कक्षातून नजर ठेवली जात आहे.

जिल्ह्यात बाहेरून मोठ्या संख्येने लोक दाखल झाले आहेत. यातील प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवणे शक्य नाही. अशा वेळी सिक्युएमएस हे अ‍ॅप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. प्रशासनाने संकलित केलेल्या माहितीचा यासाठी मोठा फायदा होत आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करून बाहेरून आलेल्या व्यक्तींच्या प्रत्येक हालचालीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. -भरत शितोळे,

अपर जिल्हाधिकारी, रायगड

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply