Breaking News

रोटरी क्लब पनवेलच्या अध्यक्षपदी अविनाश कोळी

पनवेल ः रामप्रहर वृत्त

माजी जिल्हा प्रांतपाल डॉ. दीपक पुरोहित यांच्या प्रमुख उपस्थितीत व सहाय्यक प्रांतपाल   शाम फडणीस, रोटरॅक्ट जिल्हा सचिव द्विजेश नाशीककर यांच्या उपस्थितीत रोटरी क्लब पनवेल महानगरचे अध्यक्ष म्हणून अविनाश भगवान कोळी यांनी मावळते अध्यक्ष  गणेश मांजरेकर यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. सचिवपदी शामला कुलकर्णी व खजिनदारपदी महेंद्र मारू यांनी पद्भार स्वीकारला. रोटरी कम्युनिटी हॉल, नवीन पनवेल येथे हा पदग्रहण सोहोळा पार पडला.

या वेळी रोटरॅक्ट क्लब ऑफ पनवेल महानगरच्या अध्यक्षपदी  साहील भुस्कुटे यांनी मावळते अध्यक्ष सोहम कोळी यांच्याकडून पद्भार स्वीकारला. रोटरॅक्ट सेक्रेटरी म्हणून प्रतिक जेवूरंगी यांनी व खजिनदार म्हणून ऋषी नागविस यांनी पद्भार स्वीकारला.

रोटरॅक्ट क्लबचा (12 ते 18 वयोगट) अध्यक्ष म्हणून इंटरॅक्टर ललित शिंगारे याने इंटरॅक्टर राशी घोडीचोर हिच्याकडून पद्भार स्वीकारला. इंटरॅक्टर अद्वैत हा सेक्रेटरी झाला.

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना   डॉ. दीपक पुरोहित यांनी रोटरी आंतरराष्ट्रीय स्तरावर कशाप्रकारे काम करीतआहे व रोटरी सभासदांनी कशाप्रकारे कार्य करावे, ज्यामुळे समाजाला त्याचा उपयोग होईल, याचे महत्त्व सांगितले व पनवेल महानगर हा क्लब पुढे नावाजलेला क्लब व्हावा, अशा शब्दात शुभेच्छा दिल्या. अविनाश साहिल, इंटरॅक्टर ललित यांनी यावर्षी कशाप्रकारे सामाजिक कार्य करणार, हे आपल्या मनोगतातून सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व रोटरीयन, रोटरॅक्टर, इंटरॅक्टर व रोटरी सदस्यांच्या परिवाराने योगदान दिले. या पदग्रहण सोहोळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर, रोटरी, रोटरॅक्ट क्लबचे सदस्य संख्येने उपस्थित होते.

Check Also

पनवेल कोळीवाड्यात आई एकविरा मातेचे तैलचित्र, सभामंडप, सेल्फी पॉईंटचा शुभारंभ; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त आई एकविरा मातेचे तैलचित्र, सेल्फी पॉईंट आणि सभामंडप पनवेल कोळीवाड्याची शान …

Leave a Reply